Reduced price! उडणाऱ्या लामांचा प्रदेश आणि हिमालय प्रवासातील सत्यकथा

Udanarya Lamancha Pradesh - उडणाऱ्या लामांचा प्रदेश आणि हिमालय प्रवासातील सत्यकथा

10119

New product

Authors : Gaurav Punj

Publication : Amey Prakashan

More details

4 Items

Rs. 213 tax incl.

-15%

Rs. 250 tax incl.

आपण किती नगण्य आहोत याची जाणीव घ्यायची असेल तर, निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्गाचा मार्ग साधा, सोपा आणि स्वच्छ आहे. आपला अहंकार दूर करण्यासाठी निसर्गामध्ये जाणे महत्त्वाचे आहे. या प्रवासवर्णनाद्वारे निसर्गाचा आस्वाद घेता येईल. हे पुस्तक पाहिल्यावरच प्रवासाला निघावेसे वाटते...

थंड हवेची ठिकाणे, मॉल रोड्स आणि ठरावीक ‘पॉईंट्स’ या पलीकडेही एक वेगळे हिमालयाचे स्वरूप आहे. हिमालय, जिथे हिरव्यागार विस्तीर्ण कुरणांवर फुलांचे ताटवे फुलतात, झरे झुळुझुळु वाहतात, हिमनदीचे दर्शन होते आणि पर्वतरांगा पार करून जादुई प्रदेशात प्रवेश करता येतो. (जिथे तुम्हांला उडणारे लामा भेटू शकतात) आणि हो, तलावाच्या काठावर पेडल बोट्स अभावाने सुद्धा सापडणार नाहीत. हाच खरा हिमालय आहे आणि इथेच घडलेल्या तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या, प्रवासात घडलेल्या गोष्टी या पुस्तकात आहेत.
पुस्तकाचा मूळ उद्देश असा की, जेव्हा तुम्हांला कुटुंबीयांसमवेत सुट्टी घालवायची असेल, साहसी ट्रेकवर जायचे असेल किंवा आत्मशोधाच्या दिशेने एकट्याला भ्रमंती करायची असेल तेव्हा या हिमालयातील विविध भागांमधील (काश्मीर ते लडाख, हिमाचल, गढवाल, कुमाऊँ, सिक्कीम, अरुणाचल) गोष्टी तुम्हांला एखाद्या नवीन ठिकाणी जाण्याचा पर्याय म्हणून उपयुक्त होतील.

या पुस्तकात भारताची टॉप फिटनेस प्रोफेशनल ऋजुता दिवेकर हिनेही एक प्रकरण लिहिले आहे. ट्रेक का करावा, ट्रेकचे शरीरावर होणारे परिणाम, ट्रेकचे फायदे मिळवण्यासाठी तिथे काय आहार घ्यावा अशा विविध पैलूंवर या प्रकरणात प्रकाश टाकला आहे.

Write a review

Udanarya Lamancha Pradesh - उडणाऱ्या लामांचा प्रदेश आणि हिमालय प्रवासातील सत्यकथा

Udanarya Lamancha Pradesh - उडणाऱ्या लामांचा प्रदेश आणि हिमालय प्रवासातील सत्यकथा

Authors : Gaurav Punj

Publication : Amey Prakashan

30 other products in the same category: