Reduced price! Katal

Katal - कातळ

9788177668186

New product

Author : Ranjeet Desai / रणजित देसाई

Publishers : Mehta Publishing House

Language : Marathi

More details

8 Items

Rs. 102 tax incl.

-15%

Rs. 120 tax incl.

Author: Ranjit Desai

१९४८ साली कूळकायदा आला. या कायद्यानं शेकडो वर्ष अबाधित राहिलेली जीवनाची घडी पार विसकटून गेली. पड जमिनीला प्रथम नांगर लागताच जमिनीची जी दशा होते, तीच दशा ग्रामीण भागातल्या सुप्त व संथ जीवनाला प्राप्त झाली. जमिनीच्या आसर्यानं जीवन जगणारे सारे समाजथर या कायद्यानं बदलले. इनामदारांपासून ते छोट्या शेतकर्यापर्यंत,देवस्थानापासून ते बारा बलुतेदारांपर्यंत. इनामदाराच्या मिराशीवर कुळांकडून खंड वसूल करणारा देसाई, देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, खोत यांच्यासारखा वतनदारवर्ग जसा जमिनीला मुकला, तसाच, शहरांत गिरण्यांतून काबाडकष्ट करीत, आयुष्यभर राबत, मिळालेली कमाई गावी पाठवून जमीन विकत घेतलेला मजूरही ती जमीन कुळाच्या हाती सुपूर्द करून मोकळा झाला. याच काळात नवनवीन स्थित्यंतरं घडत होती. नव्या सुधारणा विजेच्या वेगानं घडत होत्या. त्यांचा धक्का बसला खेड्यांतून चालत आलेल्या पिढ्यान्पिढ्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीला. जमीनविषयक झालेल्या कायद्यांनी घराघरांतून वाटण्या सुरूझाल्या. बापमुलगा, भाऊभाऊ यांच्यांत भांडणं सुरूझाली. सारं ग्रामीण जीवन या नांगरटीत उलथंपालथं झालं. या बदलत्या जीवनाचा, बदलत्या संस्कारांचा मागोवा घेणाऱ्या, रणजित देसाईच्या सिद्धहस्त शैलीतील "पेरा उगवला` आणि "पांढर उठली` या मस्तक सुन्न करणाऱ्या दोन दीर्घकथांचा अविस्मरणीय संग्रह : "का त ळ`!

Write a review

Katal - कातळ

Katal - कातळ

Author : Ranjeet Desai / रणजित देसाई

Publishers : Mehta Publishing House

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: