Reduced price! Sushilkumar Shinde - Eka Sangharshachi Vatchal

Sushilkumar Shinde - Eka Sangharshachi Vatchal - सुशीलकुमार शिंदे: एका संघर्षाची वाटचाल

10133

New product

Authors :  Dr P R Subas Chandran

Publication : Amey Prakashan

More details

5 Items

Rs. 281 tax incl.

-15%

Rs. 330 tax incl.

केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांचं हे चरित्र! त्यांच्या या चरित्राला चपखल जोड मिळाली आहे, ती महाराष्ट्रातल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भांची! त्यामुळे ही कथा प्रतिकूल परिस्थितीशी लढत स्वतःचं व्यक्तिमत्त्व घडविणार्या सुशीलकुमार शिंदे यांच्या यशोगाथेशी समांतर अशी समाजाचीही आहे. प्रतिकूल परिस्थितीशी अविरत झगडत गुणोत्कर्ष साधणार्यां एका माणसाची ही विलक्षण कथा आहे.

त्यांचे आयुष्य परिस्थितीच्या एकाच फटकार्या्त दारिद्र्यात लोटले गेले आणि त्यांना किती एक हाल-अपेष्टांना तोंड द्यावे लागले, या वास्तवाची ही कहाणी आहे. पण त्यांच्यापाशी दुर्दम्य असा निर्धार होता, एकदा निश्चय केल्यावर न नमण्याचा स्वभाव होता, जिद्द होती, त्या बळावर एकामागून एक अवघड असे अडथळेही त्याने पार केले. आयुष्यातील धीटपणाच त्याच्यासाठी पाठबळ ठरला आणि त्याने विजयगाथा साकारली, त्याची ही वास्तवातली गोष्ट आहे.

शिंदे यांच्या समग्र आयुष्याचा हा आलेख आहे. त्यांचे अगदी बालपणीचे दिवस, दहाव्या वर्षी शाळा सुटणे, बालमजूर म्हणून काम करणे, एका कारखान्यात कामगार होणे, दुसर्यांहच्या लग्नाच्या मिरवणुकीत डोक्यावरून बत्ती घेऊन जाणे, घरसंसारासाठी पैसे मिळवण्यासाठी काय कामे करावी लागली होती, ते या ठिकाणी नमूद केले आहे. दिवसभर राबायचे आणि शिक्षणाच्या ओढीने रात्रशाळेत शिकायचे हेच त्यांचे जीवन होते. शिकण्यावाचून उन्नती नाही हे ओळखून ते कष्टातही शिकत राहिले. महाविद्यालयात गेले आणि त्यांचे आयुष्य घडत गेले. शिंदेंच्या प्रत्येक यशात त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे. सकारात्मकता हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक अंगभूत गुण म्हणजे आयुष्यात आव्हान पेलण्याची क्षमता. सुखाचा जीव धोक्यात का टाकायचा, असा पळपुटा विचार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही.

Write a review

Sushilkumar Shinde - Eka Sangharshachi Vatchal - सुशीलकुमार शिंदे: एका संघर्षाची वाटचाल

Sushilkumar Shinde - Eka Sangharshachi Vatchal - सुशीलकुमार शिंदे: एका संघर्षाची वाटचाल

Authors :  Dr P R Subas Chandran

Publication : Amey Prakashan

30 other products in the same category: