New product
Author : Suhas Kshirsagar
Publication :- Udveli Books
Language :- Marathi
5 Item Items
Warning: Last items in stock!
Availability date:
Cricket Sur Tal Lay - क्रिकेट - सूर ताल लय
लेखकाचे मनोगत अक्षरांच्या दुनियेत ‘क्रिकेट - सूर, ताल, लय’ हे माझं दुसरं अपत्य. अर्थातच, कुटुंबनियोजन करण्याचा माझा बिलकूल विचार नाही. कारण तिसऱ्या अपत्याचीसुद्धा चाहूल लागली आहे. यथावकाश ते जन्माला येईलच. प्रत्येक अपत्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. तसं मागे वळून पाहताना मला जाणवलं की, माझ्या पहिल्या पुस्तकात क्रिकेटमधल्या माझ्या निवडीच्या दहाच रोमहर्षक लढतींबद्दल लिहिलं आहे. त्या सर्व लढती मी प्रत्यक्ष क्रिकेट मैदानावर जाऊन न पाहिलेल्या किंवा काही सामने खेळले गेले त्या वेळी माझा जन्मदेखील झाला नव्हता अशा आहेत. पण तरीही क्रिकेट रसिकांना/वाचकांना त्या भावल्या. त्यामुळे दुसरी आवृत्तीही निघाली. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. त्या पुस्तकातून प्रेरणा घेत हे नवीन पुस्तक मी क्रिकेट रसिकांसमोर सादर करतोय. पण या खेपेला पुस्तकाचा बाज आणि विषय एकदम वेगळाच ठरवला. ज्याप्रमाणे क्रिकेट हा माझा श्वास आहे; त्याप्रमाणेच संगीत, पर्यटन हे माझे जिवलग मित्र आहेत. सिनेसृष्टीतील अगदी कुंदनलाल सैगल, शमशाद बेगम, नूरजहाँ, गीता दत्त यांपासून ते अगदी अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजाचा मी चाहता आहे. अर्थातच, मंगेशकर कुटुंबातील सर्व गायक आणि किशोर, रफी, मुकेश, मन्ना डे, हेमंतकुमार, महेंद्र कपूर या सर्वांचा मी आजन्म भक्त आहे. पण एका गोष्टीची कबुली देतो की, मला नोस्टॅलजिक व्हायला आवडतं. मग एकदा का भारतीय सृष्टी - मग ती चित्रपट सृष्टी असो, संगीत सृष्टी असो अथवा भारतीय क्रिकेट सृष्टी असो; त्याच्या सुवर्णयुगात रमायला मला खूप आवडतं. भारतीय क्रिकेट जगतातल्या अनेक खेळींमध्ये डोकावताना - जुन्या जमान्यातले महान क्रिकेट खेळाडू, त्यांचं क्रिकेटमधलं झपाटलेपण, त्यांनी साकारलेल्या अजरामर खेळी यांचा धांडोळा घेताना असंही जाणवतं की, क्रिकेट या खेळाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे, क्रिकेट खेळाडूंच्या कर्तबगारीची नोंद ठेवणारे आणि त्यांचे पराक्रम, त्यांचं व्यक्तिमत्त्व हे सर्व क्रिकेट रसिकांपर्यंत पोचवणारे काही महानायक माझ्या निदर्शनास आले आणि त्यांनी मैदानाबाहेर राहून केलेली क्रिकेटची निरपेक्ष, निरलस सेवा हाच मी पुस्तकाचा आशय घेतला. पण एक अनुभूती म्हणून सांगतो की, ज्या वेळी या व्यक्तिमत्त्वांना मी भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांची मुलाखत घेतली; त्या वेळी मला जाणवलं की, ह्या व्यक्तींनी क्रिकेट मैदानाबाहेर केलेल्या पराक्रमाला तोड नाहीच, पण एक व्यक्ती म्हणूनसुद्धा त्या खूप महान आहेत. अशा सहा ‘रिअल हिरोज’ची ओळख, त्यांची क्रिकेटशैली, आपल्याला कदाचित अज्ञात असलेल्या काही गोष्टी आपल्यापर्यंत पोचावायचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हे सहाही जण क्रिकेट गंधर्व असून त्यांचा निगर्वीपणा, साधेपणा मला खूप भावला. नाहीतर माझ्यासारख्या छोट्या क्रिकेट भक्ताला त्यांच्यापर्यंत कदाचित सहजगत्या पोचताही आलं नसतं. यांच्यातलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कसोटीवीर, उद्योगधंद्याशी ताल असलेलं, दीर्घोद्योगी पण मनमिळाऊ, निगर्वी असं अभिजात. दुसरं व्यक्तिमत्त्व आहे क्रिकेट आकडेवारी तज्ज्ञ; त्यांच्या सहवासात क्रिकेटच्या विश्वाचं दर्शन होतं. सतत तरतरीत, चिरतरुण. काही व्यक्तिमत्त्व ‘हटके’ असतात, म्हणजे त्यांच्यात एक वेगळंच ‘रसायन’ असतं. तिसर व्यक्तिमत्त्व असंच आहे. अध्यापनाचा ध्यास, पण क्रिकेट प्रशासन नसानसांत. चौथ्या व्यक्तिमत्त्वात आहे पुण्यभूमीचा वारसा लाभलेला मराठी समालोचनाचा जनक. क्रिकेट ते ज्ञानेश्वरी अशा वेगवेगळ्या विषयांमधले पंडित. तर पाचवं व्यक्तिमत्त्व म्हणजे एक इंग्रजी समालोचक; ज्याची मराठी, इंग्रजी, गुजराती या भाषांशी नाज जोडलेली आहे. अत्यंत निगर्वी, क्रिकेट समालोचनावर निरतिशय प्रेम करणारं. या व्यक्तिमत्त्वाचा आवाज म्हणजे निसर्गातला खळखळता झरा, पण हे मनोगत लिहिताना माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत कारण आज ही व्यक्ती आपल्यात नाही. काळ या सर्वश्रेष्ठ अंपायरने त्या व्यक्तिमत्त्वाची विकेट घेऊन एका पर्वाची समाप्ती केली आहे. पण समालोचन कक्षातला त्या व्यक्तीचा आवाज आजही चिरंजीव आहे. ‘लास्ट बट नॉट द लिस्ट’ हे व्यक्तिमत्त्व सदाबहार असं आहे. क्रिकेट समीक्षण असो, क्रिकेट किंवा संगीत या कार्यक्रमांमध्ये निवेदन, असो अथवा लेखन असो - खुसखुशीतपणा आणि चविष्टपणा नेहमीच जाणवणारं व्यक्तिमत्त्व.
- सुहास क्षीरसागर
Rs. 125
Rs. 125 -17% OFF Rs. 150
Rs. 270 -17% OFF Rs. 325
Rs. 100 -17% OFF Rs. 120
Rs. 85 -15% OFF Rs. 100
Rs. 111 -15% OFF Rs. 130
Rs. 136 -15% OFF Rs. 160
Rs. 136 -15% OFF Rs. 160
Rs. 166 -15% OFF Rs. 195
Rs. 179 -15% OFF Rs. 210
Rs. 145 -15% OFF Rs. 170
Rs. 162 -17% OFF Rs. 195
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 255 -15% OFF Rs. 300
Rs. 85 -15% OFF Rs. 100
Rs. 100 -17% OFF Rs. 120
Rs. 166 -17% OFF Rs. 200
Rs. 120 -20% OFF Rs. 150
Rs. 120 -20% OFF Rs. 150
Rs. 166 -17% OFF Rs. 200
Rs. 340 -15% OFF Rs. 400
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 340 -15% OFF Rs. 400