Reduced price! Kalay Namah

Kalay Namah

9788184988260

New product

Kalay Namah

More details

10 Items

Rs. 136 tax incl.

-15%

Rs. 160 tax incl.

Author: Eva Hoffman
‘काळ’ ही मानवाला नेहमीसाठीच मिळालेली एक श्रेष्ठ देणगी आहे. अस्तित्वात असलेलं हे वास्तव नाकारताही येत नाही किंवा टाळताही येत नाही; पण जगलेल्या काळाचं स्वरूप नाट्यपूर्ण रीतीनं बदलत चाललं आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे आपली आयुर्मर्यादा वाढते आहे, तर डिजिटल साधनं छोट्या छोट्या घटकांमध्ये काळ दाबून-दडपून बसवतायत. सध्या आपण एकाच वेळी अनेक काल प्रदेशात राहू शकतो; पण काळाच्या कमतरतेची लागण आपल्याला झाली आहे. सध्या आपण खूप वेळ काम करतो. इतकं की, काम आणि विश्रांती यांमधल्या सीमारेषा धूसर झाल्या आहेत. अनेक लोकांच्या आयुष्यात पैशापेक्षा वेळ ही अधिक मौल्यवान चीज झाली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या समजांवर आणि आपल्या स्वत:वर काय परिणाम होतोय? कॉम्प्युटर्स, व्हिडिओ गेम्स आणि तत्काळ संदेशवहन अशांसारख्या अतिवेगवान तंत्रज्ञानाचा आपल्या एकाग्रतेच्या आणि चिंतनाच्या क्षमतांवर काय परिणाम होतो? एकाच वेळी अनेक कामं आणि काळाची शकलं करणारी भावनिक अस्वस्थता गेल्या काही दशकांनी अनुभवली आहे. शरीरविज्ञानशास्त्र आणि बोधावस्थेचं निरीक्षण आपण अधिक सूक्ष्म पातळीवर करतो, तेव्हा आपल्या मनावर आणि शरीरावर होणाऱ्या काळाच्या प्रक्रियांपासून आपण काय शिकतो आहोत? नैसर्गिक मानवी कालिकता अशी काही चीज आहे का, जिच्या पलीकडे जाण्याचं साहस आपण केलं, तर आपला विनाश ओढवेल? जीवशास्त्र ते संस्कृती आणि मनोविश्लेषण ते चेतामानसशास्त्र अशा जीवनातल्या विस्तीर्ण आणि शब्दातीत असलेल्या तत्त्वांचं मूलगामी संशोधन करणारी इव्हा हॉफमन विचारते : आपल्याला जाणवतं तसं, आपण काळाच्या शेवटाकडे जातोय का?

Write a review

Kalay Namah

Kalay Namah

Kalay Namah

30 other products in the same category: