Reduced price! अच्युत गोडबोले यांची नवीन तीन पुस्तकंचा संच

Artificial Intelligence / Sajeev / Pravas (Set of 3 Books)

New product

Author : Achyut Godbole / Asavari Nefadkar / Amruta Deshpande

Publication : Madhushri Publication

More details

8 Items

Rs. 700 tax incl.

-30%

Rs. 1,000 tax incl.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स १९५० च्या दशकांपासून बघितलं गेलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वप्न अनेक खाच खळगे पार करत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानांच्या मदतीनं आता पूर्णत्वास येतंय. कला क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला ते आता सज्ज झालंय. या कल्पनेमागचा इतिहास, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची ओळख, त्याचे उपयोग, त्याचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम, UBI या सगळ्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ !

प्रवास कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दींनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता १३ ते १७ व्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली होकायंत्रं, नकाशे अशी दिशादर्शक उपकरणं, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटरगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयानं यांच्या निर्मितीकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथांनी परिपूर्ण असलेलं तसंच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘प्रवास’ !

सजीव सजीवांच्या उत्पत्तीपासून ते उत्क्रांतीपर्यंत आणि बायोटेक्नॉलॉजीपासून ते जेनेटिक्सपर्यंत जीवशास्त्राचा विकास कसा होत गेला याची मनोहारी कहाणी सांगणारं आणि जीवशास्त्राचा इतिहास, त्यातल्या संकल्पना आणि त्यातल्या वैज्ञानिकांची आयुष्यं यांच्या गोष्टींची रंजक गुंफण असणारं आणि जीवशास्त्राच्या प्रचंड मोठ्या कालपटलाचा वेध घेणारा नयनरम्य कॅलिडोस्कोप म्हणजे सजीव हे पुस्तक !!

Write a review

Artificial Intelligence / Sajeev / Pravas (Set of 3 Books)

Artificial Intelligence / Sajeev / Pravas (Set of 3 Books)

Author : Achyut Godbole / Asavari Nefadkar / Amruta Deshpande

Publication : Madhushri Publication

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: