New Reduced price! Goshta Paishapanyachi - गोष्ट पैशापाण्याची

Goshta Paishapanyachi - गोष्ट पैशापाण्याची

New product

Author - Prafulla Wankhede

Publishers - Sakal Prakashan

Language - Marathi

Availability date: 10/08/2022

More details

10 Items

Rs. 200 tax incl.

-20%

Rs. 250 tax incl.

प्रकाशनपूर्व पुस्तकाची विक्री मूल्य ₹200 (limited period)
या प्रकाशनपूर्व सवलतीचा लाभ ८ ऑक्टोबर पर्यंत घेता येईल, आणि पुस्तक ९ ऑक्टबोरला सर्वत्र उपलब्ध होणार आहे.

आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.

आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.

प्रफुल्ल वानखेडे हे अनेक कंपन्यांचे संस्थांपक-अध्यक्ष आहेत. ते पुस्तकप्रेमी आहेत. वाचनसंस्कृती जोपासणे आणि वाढविणे यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ट्विटरवर त्यांचे असंख्य युथ फालोअर्स आहेत. अनोख्या पद्धतीने मूल्ये जपून व्यावसायिक यश मिळविण्याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता ते मुख्यत: ओळखले जातात. या पुस्तकाच्या लेखांमधून त्यांनी स्वत:ला आलेल्या अनुभवांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यांना भेटलेल्या माणसांकडून, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधून त्यांनी स्वत: कोणती कौशल्ये आणि गुण आत्मसात केली आहेत, हे त्यांनी यामध्ये उलगडले आहे.

प्रफुल्ल वानखेडे यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या शब्दांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. मराठी माणसांमध्ये असलेला मार्केटिंगचा न्यूनंगड आणि त्यातून उद्योग-व्यवसायाची संस्कृती रुजविण्यात येणारे अडथळे आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांनी सुचविले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात उच्च शिक्षणाचे वळण येते. त्यातून युवकांच्या आयुष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटणार असतो. त्याविषयी यशाची गुरुकिल्ली त्यांनी दिली आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांमुळे आपण कसे घडत जातो, त्याचे महत्त्वही त्यांनी माणुसकीची श्रीमंती यातून पटवून दिले आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहण्याची सूचनाही ते करतात. बचतीमधील महिलांचे स्थान याविषयी दिलेली माहिती प्रेरणादायी आहे. आर्थिक साक्षरता हा गेल्या काही वर्षातील परवलीचा शब्द झाला आहे. त्यातून गरजांचे मूल्यांकन आपल्याला करता येते आणि आपले पुढचे पाऊल कोणत्या दिशेने टाकायचे याचा निर्णय घेता येतो. प्रगतीमध्ये इमोशनल आणि इंटेलिजेंट कोशंट महत्त्वाचा असल्याचे मत अनेकजण मांडतात. मात्र, फायनांशिअल कोशंटशिवाय हे सर्व व्यर्थ असल्याचे मत त्यांनी मांडून अभ्यासाची एक नवी दिशा खुली केली आहे आणि पैशापाण्याच्या गोष्टींना नवा आयाम मिळवून दिला आहे.

Write a review

Goshta Paishapanyachi - गोष्ट पैशापाण्याची

Goshta Paishapanyachi - गोष्ट पैशापाण्याची

Author - Prafulla Wankhede

Publishers - Sakal Prakashan

Language - Marathi

Availability date: 10/08/2022

30 other products in the same category: