Reduced price! Setu Madhavra Pagdi 9 PUSTAKANCHA SET - सेतू माधवराव पगडी ९ पुस्तकांचा सेट

Setu Madhavra Pagdi 9 PUSTAKANCHA SET - सेतू माधवराव पगडी ९ पुस्तकांचा सेट

New product

Author : Setumadhavrao Pagadi

Publishers : Parshwa Publications

Translators :

Language : Marathi

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 1,820 tax incl.

-35%

Rs. 2,800 tax incl.

सेतु माधवराव पगडी नावाच्या एका थोर पुरुषाने त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वोत्कृष्ट कार्यासाठी खर्ची केला. या महान तपस्वी पुरूषाची विलक्षण बुद्धीमत्ता , फार्शी भाषेच सखोल ज्ञान व त्यावर असलेल त्याच निर्विवाद प्रभुत्व हे मराठ्यांच्या इतिहासाला अनमोल देणगी देऊन गेलं.
इतिहास म्हणजे कल्पनेचा प्रांत नव्हे , वस्तूनिष्ठ साधनांना इतिहासाच्या कसोटीवर ताडून त्याला न्याय द्यायचा असतो. अशा साधनांची उपलब्धता असेल तर संशोधनाच्या सारथ्याला निर्धोक सारथ्य करता येत. अशाच साधनांची उपलब्धता करून देण्याच काम पगडी यांनी करून दिले आहे. त्याचा गोषवारा येथे देत आहे.

औरंगजेबाचा विश्वासू अधिकारी साकि मुस्तैदखान याने मासिरे आलमगिरी या नावाने औरंगजेबाचे फार्शी भाषेत चरित्र लिहले. याचा मराठी अनुवाद पगडी यांनी मराठे व औरंगजेब या नावाने प्रसिद्ध केला.

तसेच महंमद हाशिम खाफीखान याने मुन्तखबुललुबाबए महंमदशाही या नावाने मोघल साम्राज्याचा इतिहास लिहला. पगडी यांनी या फार्शी ग्रंथांचा मराठी अनुवाद करून मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध या नावाने प्रसिद्ध केला आहे. त्याचबरोबर तारिखे दिल्कुशा या फार्शी ग्रंथांचा कर्ता भिमसेन सक्सेना याच्या ग्रंथातून मराठा मोघल संघर्षांची तीव्रता समजण्यास मदत होते. पगडी यांनी मोघल आणि मराठे या नावाने हा अनुवाद प्रसिद्ध केला आहे. आणि फुतूहाते आलमगिरी म्हणजेच आलमगिराचा विजय या ग्रंथांचा कर्ता ईश्वरदास नागर याच्या लिखाणातून वैफल्यग्रस्त अवस्थेतील औरंगजेबाचे दर्शन होते. पगडी यांनी या ग्रंथांचा अनुवाद मोघल मराठा संघर्ष या नावाने प्रसिद्ध केला आहे.
मोघल राजवटीच्या प्रदीर्घ अभ्यासांती नियतीच्या विळख्यात औरंगजेब , हिंदवी स्वराज्य आणि मोघल , भारतीय मुसलमान शोध आणि बोध असे त्यांचे ग्रंथ साकारले. तसेच १८५७ ते आणखी काही पैलु आणि मराठे व निजाम हेही ग्रंथ अभियासनिय आहेत.

मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध म्हणजे अखंड भारताचे महाभारत होय. कागदपत्रांच्या साहित्य साधनांच्या प्रचंड अशा उत्खननात मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचे दर्शन घडवण्याचे थोर कार्य सेतु माधवराव पगडी यांनी केले. इतिहास संशोधकांसाठी भली मोठी शिदोरी देऊन जाण्या-या या थोर इतिहासकारास पार्श्व प्रकाशनने दिलेली हिच खरी श्रद्धांजली होय.

Write a review

Setu Madhavra Pagdi 9 PUSTAKANCHA SET - सेतू माधवराव पगडी ९ पुस्तकांचा सेट

Setu Madhavra Pagdi 9 PUSTAKANCHA SET - सेतू माधवराव पगडी ९ पुस्तकांचा सेट

Author : Setumadhavrao Pagadi

Publishers : Parshwa Publications

Translators :

Language : Marathi

30 other products in the same category: