Reduced price! Sahityasanshodhan Vata Ani Valane - साहित्यसंशोधन वाटा आणि वळणे

Sahityasanshodhan Vata Ani Valane - साहित्यसंशोधन वाटा आणि वळणे

New product

Author : Dr .Sudhakar Shelar

Publishers : Aksharvadmay Prakashan Pune 

Language : Marathi

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 125 tax incl.

-17%

Rs. 150 tax incl.

'साहित्यसंशोधन :  वाटा आणि वळणे' :  संशोधनमीमांसेला दिशा देणारा ग्रंथ!

- विद्यापीठीय संशोधनाला दर्जा राहिला नाही यासंबंधीची चिंता देशभर केली जाते . मात्र संशोधनाचा दर्जा सुधारावा यासाठी अपेक्षित दिशा देणारे  सूत्रबध्द असे विवेचन नव्या संशोधकासमोर ठेवले जात नाही. मराठी साहित्यसंशोधनासंदर्भातील ही उणीव डॉ. सुधाकर शेलार यांनी या ग्रंथाधारे भरून काढली आहे. पदवीय संशोधनाच्या लेखनपद्धतीतील पारिभाषिक संकेत व बारकावे स्पष्ट करून शेलार यांनी साहित्यप्रकारनिहाय संशोधनाचे स्वरूप कसे असावे याचे दिशादर्शन केले आहे!  मध्ययुगीन वाङ्मयाच्या आणि लोकसाहित्याच्या संशोधनाचेही स्वरूप, दिशा आणि तंत्र या ग्रंथातून नेमकेपणाने मांडले गेले आहे. मराठी साहित्य आणि सामाजिक शास्त्रे यांचा अनुबंधही स्पष्ट केला आहे.  एकंदर
संशोधनपरलेखनाचे स्वरूप स्पष्ट करताना ग्रंथकर्त्याने चिकित्सक, विवेचनात्मक, निवडक, तौलनिक आदी पायाभूत अभ्यासभूमिकांचा   स्वरूपपरामर्श घेत  नवसंशोधकांना मार्गदर्शन केले आहे. लेखनातील शब्दसुसंगती, वाक्यरचना, प्रयोग, काळ, परिच्छेदरचना, प्रास्ताविक, समारोप ते अगदी प्रबंधाचे टंकलेखन आणि मुद्रितशोधन या बारीकसारीक बाबींसंदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी यासंबंधीचे दिशादिग्दर्शन या ग्रंथाने केले आहे . मराठी  साहित्याच्या अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी, संशोधन मार्गदर्शकांसाठी हा ग्रंथ निश्चितच मौलिक ठरेल!

डॉ. प्रल्हाद लुलेकर
निवृत्त विभाग प्रमुख,
भाषा व  वाङ्मय विभाग,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

Write a review

Sahityasanshodhan Vata Ani Valane - साहित्यसंशोधन वाटा आणि वळणे

Sahityasanshodhan Vata Ani Valane - साहित्यसंशोधन वाटा आणि वळणे

Author : Dr .Sudhakar Shelar

Publishers : Aksharvadmay Prakashan Pune 

Language : Marathi

30 other products in the same category: