Reduced price! Samagra Anandi Vastu - समग्र आनंदी वस्तू

Samagra Anandi Vastu - समग्र आनंदी वस्तू

New product

Authors :  Anand Pimpalkar

Publishers : Anandi Vastu Prakashan

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 213 tax incl.

-15%

Rs. 250 tax incl.

घर लाडकं व्हावं, छानसं व्हावं, सुखमय व्हाव ! जरी लहानसं तरी अलगद हसरं मन जपणार.!! सुख शांतिमय आनंदी वास्तू!!!

संपूर्ण जगामध्ये मानवाच्या उत्क्रांती पासून आजपर्यंत वास्तू ही संकल्पना रुजली, फोफावली आहे. ऊन, वारा व पाऊस या पासून संरक्षण करण्यासाठी माणूस प्राचीन काळी गुहेत राहत होता. हळूहळू तो वास्तूची निर्मिती करू लागला. पुढे काळ बदलला, संकल्पना बदलल्या, माणसाचे राहणीमान बदलले, पण त्याच्या भोवताली असलेले सुख:दुःखाचे चक्र मात्र अविरत सुरु आहे.

जगी सर्व सुखी असा कोण आहे? पण तरीही भौतिक सुखाला आपण सुख मानतो. हे भौतिक सुख पैशाने विकत घेतो. पैसा आपल्या यशावर ठरतो तर यश आपल्या पूर्व कर्तृत्वावर ठरते. कर्तृत्वाला नशीबाची साथ लागते. नशीबाला कर्माची साथ लागते आणि आपल्या ह्या सर्व गोष्टींना पूरक ठरते ती आपली वास्तू जशी फायद्याची ठरते तशी तोट्याचीही ठरते. ज्योतिषशास्त्र, नशीब व पूर्वजन्म न मानणारी व्यक्ती ह्याला भंपक म्हणतील. वेद, पुराणे, शास्त्रे व त्यातील असलेला कर्म विपाक सिद्धांत ज्योतिष, वास्तू व आयुर्वेद शास्त्र हे प्राचीन ऋषीमुनींनी मांडलेले शास्त्र भंपक कसे मानावे? कधी कधी काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर घासल्या जाऊ शकत नाहीत. आपण त्या नाहीत असे म्हणू शकत नाही. बऱ्याच गोष्टी ह्या अनुभवावर आधारित असतात. पण वास्तू, ज्योतिषशास्त्र यांचा सखोल विचार केला तर यातील विज्ञान, भौतिकता व निसर्गचक्र यांना अनुकूल असणारे हे शास्त्र आहे. हे पटल्याशिवाय राहत नाही.

“समग्र आनंदीवास्तू” या पुस्तकात यापूर्वी नसलेल्या बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे. जसे मंदिराचे वास्तुशास्त्र, पिरॅमिड त्याचबरोबर सुखी जीवनाकरिता सोपे उपाय व इतर सर्व माहितींचा खजिना “समग्र आनंदीवास्तू” मध्ये रिता केला आहे. आपण त्याचा आनंदाने स्वीकार करावा.

Write a review

Samagra Anandi Vastu - समग्र आनंदी वस्तू

Samagra Anandi Vastu - समग्र आनंदी वस्तू

Authors :  Anand Pimpalkar

Publishers : Anandi Vastu Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: